@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 08 important cabinet decisions were taken in the cabinet meeting held today, June 24th ] : आज दिनांक 24 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मध्ये झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 08 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित घेण्यात आले आहेत .
01.शक्तीपीठ महामार्ग : पवनार ( वर्धा ) ते पन्नादेवी ( जि.सिंधुदुर्ग ) या महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे . या महामार्गामध्ये साडेतीन शक्तीपीठे , 02 ज्योतिर्लिंग व अंबेजोगाई व पंढरपुर समवेत 18 तीर्थक्षेत्र जोडले जाणार आहेत . याकरीता 20,000/- कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजूरी देण्यात आलेले आहे .
02.वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्ता मध्ये वाढ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा आहार , निर्वाह भत्ता तसेच वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता मध्ये मोठी वाढ करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .
03.विद्युतगृह प्रकल्प कोयना धरण सुधारणांस प्रशासकीय मंजुरी ..
04.राज्य वस्तु व सेवा कर 2017 मध्ये सुधारणा करण्यास व आगामी अर्थसंकल्पिय अधिवशन मध्ये याबाबत विधेयक सादर करण्यास मंजूरी .
हे पण वाचा : डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !
05.महाराष्ट्र कर , व्याज ,विलंब शुल्क ( सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ) कंपनीच्या थकबाकीच्या तडजोडीकरीता सुधारणा विधेयक आणण्यास मंजूरी .
06.उच्च न्यायालय वांद्र पुर्व येथील आरक्षित असणाऱ्या भुखंड वरील विस्थापितांकरीता द्यावयाचे 31 कोटी 75 लाख रुपये शुल्क माफ करण्यास मंजूरी .
07.पिंपरी – चिंचवड पालिका प्रशासन मधील चिखली या भागातील दफनभुमी च्या 40 टक्के क्षेत्र मैला शुद्धीकरण केंद्र करीता वापरण्यास मंजूरी .
08. हुडको या संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या 2,000/- कोटी रुपयांच्या कर्जास राज्य सरकारकडून हमी देण्यास मंजुरी .
- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )