@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Important GR regarding additional pay/special pay if State Officers/Employees are assigned additional duties in addition to their posts ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत 05 सप्टेंबर 2018 रोजी मार्गदर्शक सूचना देणे संदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येतो . तेव्हा अशा दुसऱ्या पदाकरिता त्यास अतिरिक्त वेतन / विशेष वेतन मंजूर करण्यात येत असते . यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मध्ये परिशिष्ट 01 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे .
सदर अतिरिक्त वेतन / विशेष वेतन हे दोन वर्षांपुढील अतिरिक्त कार्यभार करिता दिले जाते . सदर अतिरिक्त कार्यभार कोणास द्यावे यासंदर्भात सदर शासन निर्णय मध्ये काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , अतिरिक्त कार्यभार हे संबंधित कार्यालयामध्ये कर्मचारी / अधिकारी उपलब्ध नसतील अशा वेळेस निम्न संवर्गातून ज्येष्ठ असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर (PRP) मिळणारं पगार ; जाणून घ्या वृत्त !
अतिरिक्त कार्यभार दिल्यानंतर सदर अधिकारी / कर्मचारी त्याच्या मूळ पदाच्या कर्तव्य जबाबदारी पार पाडून अतिरिक्त पदाचा कार्यभार पूर्ण करण्याची जबाबदारी सदर अधिकारी कर्मचाऱ्यावर असते .
एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिला जात नाही . अतिरिक्त कार्यभार दिलेले रिक्त पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाने करण्याची बाब नमूद आहे .
अतिरिक्त वेतन विशेष वेतन देणे करिता वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार कार्यवाही होत असते . या बाबत सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025