@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big relief for employees; Minimum basic wage rate fixed – Government notification issued ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन दर निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 06 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .
दर अधिसुचनानुसार कुशर , अकुशल व अर्धकुशन कामगारांच्या वर्गवारीनुसार व परिमंडळ निहाय किमान मूळ वेतन दर ( दरमहा ) निश्चित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका व अ व वर्ग व ब वर्ग नगरपालिका / नगरपरिषद हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा परिमंडळ 01 मध्ये समावेश असणार आहे .
तर परिमंडळ 02 मध्ये राज्यातील क व ड वर्ग नगरपालिक / नगरपरिषदांच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश असणार आहे तर परिमंडळ – 3 मध्ये परिमंडळ 01 व परिमंडळ 02 वगळून राज्याच्या उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असणार आहे .
हे पण वाचा : गट ड संवर्गातील विविध पदासाठी सरळ सेवा महाभरती..
परिमंडळ निहाय कामगारांची वर्गवारी व मुळ किमान वेतन दर ( दरमहा ) पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे पाहु शकता ..
परिमंडळ | कुशल कामगार | अर्धकुशल | अकुशल |
परिमंडळ -1 | 30,520/- | 28,340/- | 25,070/- |
परिमंडळ -2 | 26,160/- | 23,980/- | 21,800/- |
परिमंडळ -3 | 23,980/- | 21,800/- | 18,530/- |
यांमध्ये रोजंदारीवर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय असणारी मजूरीचे किमान दर तो कमागार त्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजूरीच्या दरांना 26 ने भागून येणारा भागाकार नजिकच्या पैशांपर्यंत पुर्णांकात करुन काढण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच किमान वेतन दरामध्ये साप्ताहीक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असणार आहे . किमान वेतन दरांमध्ये मूळ दर विशेष भत्ता व सवलती असल्यास त्याचे रोख मूल्य यासाठी अनुज्ञेय असलेल्या सर्व दरांचा समावेश असणार आहे .

- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025