केंद्र / राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढ बाबत संक्षिप्त आढावा ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Brief review regarding increase in dearness allowance of central/state employees/pensioners ] : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए वाढ संदर्भात संक्षिप्त आढावा या वृत्तामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात ..

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2025 पासुन 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु आहे . आता जुलै 2025 मध्ये डी.ए वाढ होईल . केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी डी.ए वाढ लागु होणे अपेक्षित आहे .

राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीचा आढावा : महाराष्ट्र राज्यातील सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारक यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दि.01.01.2025 पासुन 02 टक्के ( एकुण 55 टक्के ) महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबतचा प्रस्ताव राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयावर उद्यापासुन सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशात घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांचा एकुण डी.ए हा 55 टक्के इतका होईल .

हे पण वाचा : तब्बल 15,000+ जागांसाठी सरकारी नोकर भरती जाहिराती प्रसिद्ध ; वाचा सविस्तर.

सातवा वेतन आयोगचा शेवटची डी.ए वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.07.2025 रोजीची सातव्या वेतन आयोगातील शेवटची डी.ए वाढ लागु असेल , कारण दिनांक 01.01.2026 पासुन नविन / आठवा वेतन आयोग लागु होईल . नविन वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ताचे दर पुन्हा एकदा शुन्य टक्के इतका होईल .

जुलै 2025 मध्ये 03 टक्के डी.ए वाढीची शक्यता : माहे जुलै 2025 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 03 टक्के डी.ए वाढीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . ज्यामुळे सातवा वेतन आयोगाचा शेवटचा डी.ए वाढ ही 58 टक्के इतकी असेल .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment