@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding online transfer issued on 05.02.2026 ] : ऑनलाईन बदली बाबत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे विधानभवन ( विकास आस्थापना शाखा ) यांच्या मार्फत दि.05.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, प्राथमिक शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रिया 2025 बाबत मा.विभागीय आयुक्त पुणे विभाग , पुणे यांच्याकडून दाखल केलेल्या अपील प्रकरणी दिनांक 29.01.2026 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आलेली सुनावणी नुसार प्रशासकीय कारणास्तव तहकुब करण्यात आलेली होती .
सदर शिक्षकांनी दाखल केलेल्या अपीलाच्या अनुषंगाने तहकुब केलेली सुनावणी दिनांक 12.02.2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.विभागीय आयुक्त पुणे विभाग ,पुणे यांचे दालनात आयोजित करण्यात आली असल्याने , नियुक्ती प्राधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच संबंधित शिक्षकांना अपील सुनावणीकामी वेळेवर उपस्थित राहणे बाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत . तसेच सुनावणी कामी अपीलार्थी शिक्षक गैरहजर राहील्यास याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच संबंधित शिक्षकांच्या अपील अर्जाच्या अनुषंगाने …
परिपुर्ण माहिती व आवश्यक त्या कागदपत्रासह शिक्षणाधिकारी जि.प.पुणे व विषयाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना उपस्थित राहणे बाबत सुचना देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत ..

- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !