Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Employee Amount Transfer to NPS Account ] : कर्मचाऱ्यांची जमा असणारी रक्कम ही त्यांच्या एनपीएस खाती वर्ग करणेबाबत , कृषी व पदुम विभाग मार्फत दि.27.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेत सहभागी असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची सन 2023-24 या कालावधीत नियोक्ता व कर्मचारी हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये , हस्तांतरित करण्यासाठी वित्तीय सल्लागार , महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन , पुणे यांच्या संदर्भिय पत्रानुसार 153,76,32,012/- रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यास विनंती करण्यात आलेली होती .
सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था मधील नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी हे राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) योजनेत समाविष्ट झाले आहेत .
त्यानुसार सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये जमा झालेली रक्कम , त्यावरील शासनाचे अंशदान व व्याज अशी एकुण 153,76,32,012/- एवढी रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण कडे वर्ग करणेकरीता विद्यापीठ निहाय निधीचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | विद्यापीठाचे नाव | वितरीत निधीचा तपशिल ( रुपये ) |
01. | राहुरी | 109,74,07,725/- |
02. | अकोला | 11,92,50,143/- |
03. | परभणी | 14,82,67,187/- |
04. | दापोली | 17,27,06,157/- |

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025