@marathipepar दर्शना पवार प्रतिनिधी [ Employees’ protest in Delhi against NPS/UPS pension scheme. ] : केंद्र सरकारकडून एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना नविन एकीकृत पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे , सदर पेन्शनच्या विरोधात आता कर्मचारी आक्रमक भुमिका घेत , दिनांक 01 मे 2025 रोजी दिल्ली येथे महा-आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहेत .
कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकीकृत पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळतच नाही , अशी भुमिका घेत कर्मचाऱ्यांकडून दिनांक 01 मे 2025 रोजी महा-आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे .
NMPS संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सदर महा- आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . दिनांक 01 मे 2025 रोजी जंतर मंतर येथे तब्बल 1 कोटी पेक्षा अधिक कर्मचारी सदर आंदोलनास उपस्थित राहणार असल्याची संभावना व्यक्त करण्यात आलेली आहे .
आंदोलनाचे नेतृत्व हे NMPS संघटनेचे अध्यक विजय कुमार व राष्ट्रीय महासचिव स्थित प्रज्ञा हे करत आहेत . याकरीता कर्मचाऱ्यांना सदर आंदोलनास येण्यासाठी संघटनेकडून आव्हान करण्यात आले आहेत .
एकीकृत पेन्शन योजनांमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन योजनाची हमी दिली तरी कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना पुर्ववत लागु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025