Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ EVM machin against go to suprem court ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल जाहीर झाला आहे , यांमध्ये महायुती पक्षांच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला असून , ईव्हीएम मशीन विरोधात सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेणार असल्याचे , वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी मिडीया समोर बोलताना सांगितले आहेत .
वडगाव शेरी या मतदार संघातुन डॉ.हुलगेश चलवादी हे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार रिंगणात होते . त्यांच्या मते सदर मतदार संघात त्यांच्या हक्काचे 50 हजार पेक्षा अधिक मते आहेत . परंतु तेवढे देखिल मते न मिळाल्याने , ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप त्यांच्या कडून केला जात आहे .
यामुळे आता डॉ.चलवादींनी यांच्याकडून ईव्हीएम यंत्रणे संबंधी तक्रार निवडणुक आयोगांकडून केली असून , याबाबत दाद मागण्याकरीता सर्वोच्च न्यायालयांमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.चलवादींनी यांच्याकडून देण्यात आलेली आहे .
तर दुसरीकडे डॉ.चलवादी यांनी बोलताना सांगितले कि , वडगाव शेरी मतदार संघांमध्ये मतासाठी प्रस्थापित असणाऱ्या पक्षांनी तब्बल 150 कोटी रुपयांचे वाटप केल्याचा आरोप देखिल करण्यात आलेला आहे . डॉ.चलवादी यांना सदर निवडणुकीत केवळ 3,762 इतकी मते मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा संशय चलवादी यांनी व्यक्त केला आहे .
तर दुसरीकडे दहिसर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांना केवळ दोनच मते मिळाली आहेत , विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात 04 जन असुन देखिल फक्त दोनच मते मिळाल्याने , ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे .
- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .
- वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी !