मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना बाबत , स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Explanation regarding Chief Minister’s Child Blessing Scheme ] : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना बाबत स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे .

सदर प्रसिद्धीपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सध्या सोशल मिडीयावरुन मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल होत आहेत , त्यामध्ये दिनांक 01 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यु झाला आहे ..

व बालकांचे वय हे 18 वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 02 मुलांस बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा 4000/- रुपये मिळणार आहेत . व याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत , असे प्रसारित करण्यात येत आहेत .

तसेच सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहेत कि , महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसुन सदर बाब अफवा आहे . त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही ..

याबाबत सावधानता बाळगावी व अशा अफवा असलेल्या सोशल मिडीया पोस्टवर विश्वास ठेवू नयेत असे स्पष्टीकरण केले आहे .तसेच अनाथ अथवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय , महिला व बालविकास भवन जिल्हा परिसर यवतमाळ या कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनांकडून करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment