सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी गुड न्युज ; महागाई भत्ता मध्ये जानेवारी 2024 पासुन वाढ – कॅबिनेट निर्णय ?

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Good news for government employees/pensioners; Dearness Allowance to increase from January 2024 – Cabinet decision? ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची माहिती समोर येत आहेत , ती म्हणजे बऱ्याच दिवसापासुन प्रलंबित असणारा डी.ए वाढीबाबत , अखेर केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे .

AICPI निर्देशांकाच्या आधारे डी.ए मध्ये वाढ : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए वाढ करण्यात येते , सदर जानेवारी मधील डी.ए वाढीकरीता जुलै ते डिसेंबर या कालावधीतील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला जातो . सदर कालावधीतील निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे .

डी.ए मध्ये किती टक्के वाढ होणार ? – ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये परत 3 टक्क्यांची वाढ होणार आहे . सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना एकुण 53 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे , यात आता पुन्हा एकदा 3 टक्के वाढ झाल्यास , एकुण डी.ए 56 टक्के इतका होणार आहे .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे सन 2024-25 मधील तरतुदीचे पुनर्विनियोजन बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.25.03.2025

निर्णय कधी होणार : प्राप्त माहितीनुसार पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . कारण डी.ए वाढीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडून कॅबिनेट निर्णयासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे .

डी.ए वाढीमुळे पगारात होणार मोठी वाढ : डी.ए वाढीमुळे वेतनात किमान 540/- रुपये तर कमाल 2500/- पर्यंतची वाढ होईल . याशिवाय डी.ए आधारित भत्यांमध्ये देखिल वाढ होणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment