@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR – Finance Department regarding giving fictitious salary increment.. ] : काल्पनिक वेतनवाढ देणेबाबत , राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 28 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 30 जुन रोजी निवृत्त होणाऱ्या तसेच झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलैची काल्पनिकरित्या वेतनवाढ विचारात घेवून , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत विविध कार्यालयांतुन राज्य सरकारला निवेदन प्राप्त झाले आहेत .
यांमध्ये मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाचा विचार करता सर्व विभागांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जे राज्य सरकारी कर्मचारी दिनांक 30 जुन रोजी निवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील 12 महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे , अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून …
त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारित करण्याकरीता संबंधित कार्यालयांकडे अर्ज करणेबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करणेबाबत , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच यानंतर अर्ज प्राप्त झालेल्या नंतर मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशात नमुद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सदर लाभ सुधारित करण्यात आल्याच्या नंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील 03 वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी …
जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पुर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येवू नये .
मा. उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक 16.02.2023 रोजीच्या आदेशातील नमुद करण्यात आलेल्या अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026