@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ If you have opted for the revised National Pension Scheme, this is the pension you will get after retirement ] : राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 नंतर शासन सेवेत रुजे झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाचा विकल्प निवडला असेल , अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ कसा मिळेल , याबाबत सविस्तर माहिती जाणून घेवूयात .
ज्या कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विकल्प स्विकारला असेल , अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजना प्रमाणे शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे . याकरीता किमान 10 वर्षे सेवा पुर्ण करणाऱ्यांसाठी किमान 10,000/- रुपये पेन्शनची तरतुद करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सदर पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास , त्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन तसेच मृत्यु-नि उपदानाचा लाभ मिळेल . कुटुंब निवृत्तीवेतन देताना मृत्युनंतर निश्चित होणाऱ्या 60 टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून दिले जाईल .
हे पण वाचा : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
राजीनामा दिल्यास कोणताच लाभ नाही : कर्मचाऱ्यांने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये राजीनामा दिल्यास त्यास निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ अनुज्ञेय करण्यात येणार नाहीत . तर राष्ट्रीय निवृत्तीवेतनाचे लाभ दिले जाईल .
सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाचा लाभ राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांकरीता सदर नविन पेन्शन योजनेचा पर्याय खुला करण्यात आला आहे . त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन नको असेल , अशांना एकरकमी रक्कम देण्याची देखिल तरतुद आहे .
तसेच निवृत्तीनंतर गट विमा योजना रक्कम , अर्जित रजेचे रोखीकरण , निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येईल .एकंदरित राष्ट्रीय पेन्शन योजना पेक्षा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना अधिकचे लाभ मिळणार आहेत .
- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )