Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding medical expense reimbursement issued on 27.02.2026 ] : वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.27.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन शासनांस सादर केले जाणार आहेत .
तसेच शासन स्तरावरुन प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर असे निर्देशास येत आहेत कि , उपसंचालक स्तरावरुन प्रस्तावाची तपासणी न करता अपुर्ण प्रस्ताव / तपासणी सुचीनुसार कागदपत्रे नसलेली प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येत आहेत .
तसेच शासन स्तरावर प्रस्ताव सादर झाल्याच्या नंतर प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे प्रस्तावांना विलंब होत आहे असे नमुद करण्यात आले आहेत .तसेच शासन स्तरावर प्राप्त समितीचे इतिवृत्त , वैयक्तिक मान्यता शासन आदेश 100 टक्के अनुदानित पदाचे वेतन घेत असल्याचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाचे प्रमाणपत्र शिक्यांसहित , शाळा मान्यतेचे शासन आदेश शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी ..
असल्यास शाळा 100 टक्के अनुदानित असल्याबाबतचे शासन आदेश व रुग्णालयीन कालावधीतील शाळेची संच मान्यता इ.कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावेत . असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर कागदपत्रे प्रमाणित करुन व शिक्यांसहित शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत .

- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !