@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government circular regarding inter-district transfer of Group C and D cadre employees. ] : राज्यातील जिल्हा परिषद सेवेतमधील गट क व ड संवर्गातील आंतरजिल्हा बदलीबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली करीता जर कर्मचाऱ्यांने अर्ज सादर केल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमती नंतर पुढील कार्यवाही केली जाईल , याकरीता काही अटी / शर्ती नमुद करण्यात आलेल्या आहे .
यांमध्ये ज्या जिल्हा सेवेत त्यांने जे पद धारण केले असेल त्या जिल्हा सेवेतील पदावर नेमणू करु शकते , तसेच केवळ बढती देवून भरण्यात येणाऱ्या पदावर अशा नेमणूका करण्यात येणार नाहीत व त्या नामनिर्देशन करुन नेमणूक करण्यासाठी ज्या रिकाम्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या असतील त्या रिकाम्या जागांवर करण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
तसेच आपसांत बदलीने नेमणूक झाल्यास अशा प्रकारच्या नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांने पुर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील / ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता स्वीकारावी लागेल .
तसेच कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरुन अशा प्रकारच्या नेमणूक झाल्यास अथवा अशी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या त्या संवर्गातील ज्येष्ठता नंतर जिल्हा परिषदेमध्ये अशी नियुक्ती ज्या तारखेस झाली असेल , त्या तारेखपासून राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025