@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Government Circular regarding Senior and Selection Category issued on 15.03.2025 ] : वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील पुर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र पुणे मार्फत नियोजन सुरु आहे .
तसेच प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण करीता शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल विकसित करण्यात येत असून , सेवार्थ प्रणाली अंतर्गत अद्ययावत माहिती सदर पोर्टलकरीता आवश्यक असल्याने , आदिवासी विकास ..
विभागाच्या शाळेतील शिक्षकांची विहीत नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली एपीआय सेवापुर्व विभागाच्या मेलवर लवकरात लवकर माहिती सादर करण्याची विनंती मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्या प्रति करण्यात आली आहे .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025