@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decisions regarding employees issued on 10.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 10 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय कृषी व पदुम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृतती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती नमुद करण्यात आलेली आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे कुटुंबाने नमुना – 3 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणे बाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास , त्या अनुषंगाने कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान अनुज्ञेय करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी नियम 1982 अंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास सदर कर्मचाऱ्याने शासन निर्णयास अनुसरुन रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी कार्यवाही करणेबाबत नमुना क्र.02 सदर शासन निर्णयांमध्ये देण्यात आला आहे .
हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
तसेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याने शासन निर्णयास अनुसरुन महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे रुग्णता निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास , त्या अनुषंगाने रुग्णता निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी विकल्प नमुद नमुद करण्यात आला आहे .
या संदर्भातील सविस्तर विकल्प नमुने व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (GR)
- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .
- वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी !