@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important press note for recruitment of Education Servant / Teacher under Pavitra system Phase 2 ] : पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती च्या दुसऱ्या टप्पा बाबत , महत्वपुर्ण प्रेस नोट दिनांक 15 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे .
सदर प्रेस नोट मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दुसऱ्या टप्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहीरातीसाठी दिनांक 20.01.2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे . तसेच दिनांक 20.01.2025 ते दिनांक 15.03.2025 पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
अद्याप पर्यंत व्यवस्थापनांना जाहीरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने , पवित्र पोर्टलवर जाहीरात प्रसिद्ध करण्याकरीता दिनांक 31 मार्च 2025 पर्यात मुदतवाढ देण्यात येत आहे .
यामुळे राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना या द्वारे आवाहन करण्यात येते कि , आपल्या अधिनस्त असणाऱ्या शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरीता पवित्र पोर्टलवर जाहीरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी , व पवित्र पोर्टलवर जाहीरात देण्यासाठी अधिक शिक्षक पदभरती संकेतस्थळाला भेट देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहीरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या मेलवर संपर्क साधण्याचे सुचित करण्यात आले आहेत .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025