राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; जुन वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ June salary/pension payment will include increased dearness allowance and revised pay scale benefits ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे माहे जुन महिन्याचे वेतन तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन देयक सोबत वाढीव महागाई भत्ता तसेच सुधारित वेतनश्रेणीचा लाभ प्राप्त होणार आहे .

01.वाढीव महागाई भत्ता : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन तसेच पेन्शन धारकांना जुन महिन्यांच्या पेन्शन सोबत 02 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ डी.ए थकबाकी फरकासह मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे .

प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के डी.ए वाढ बाबतचा प्रस्ताव राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला असून , सदर प्रस्तावाला या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंजूरी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

यामुळे राज्य कर्मचारी तसेच / पेन्शन धारक यांना माहे जानेवारी 2025 पासुन 02 टक्के वाढीव महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे . यामुळे एकुण डी.ए दर हे 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे .

हे पण वाचा : मुंबई येथे महाभरती ; लगेच करा आवेदन.

02.सुधारित वेतनश्रेणीचा लाभ : खुल्लर समितीने शिफारस केलेल्या 104 पदांना सुधारित वेतनश्रेणी माहे जुन महिन्यांच्या वेतनासोबत लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे सदर 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्‍या पगारात माहे जुन महिन्यांपासुन वाढ होणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment