Marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra state politician news ] : राज्यामध्ये निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी देखील सत्ता स्थापनेचा विचार अद्याप महायुती सरकारकडून केला जात नाही . यामागचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार ? यावरून सध्या संघर्ष सुरू आहे .
सध्या विधानसभा निवडणुका 2024 चा निकाल पाहिला असता भारतीय जनता पार्टीला 132 जागेवर यश मिळाले आहे , तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाली आहेत . तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाली आहेत . भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्याने , भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडून होत आहे .
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका संपन्न झाले आहेत , त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांनी मोलाची साथ दिल्याने , एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावेत . अशी अपेक्षा शिंदे गटाच्या आमदाराकडून होत आहे , यामुळे राज्यात राजकीय सत्ता-संघर्ष वाढत चालला आहे .
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर , मौन धारण केली आहेत . कारण सध्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने , एकनाथ शिंदे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे . तर यावरून एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की , भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देवू , असे स्पष्ट केले आहे . यावरून समजते की मा. एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदावरून नाराज असल्याचे स्पष्ट होत आहेत.
एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून 02 ऑफर : एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टी कडून दोन ऑफर दिले आहेत , यामध्ये राज्यात उपमुख्यमंत्री पद तर केंद्रामध्ये मंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या जात आहेत .
- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .
- वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी !