मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन आयोगांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे .सध्याच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट फिटमेंट फॅक्टरचा विचार केला असता , सध्या केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये मिळते .
तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये मिळते .आता सुधारित वेतन आयोगांनुसार म्हणजेच पुढील वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढविण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियनकडून करण्यात आलेली असून , या मागणीला केंद्र सरकारकडून देखिल सहमती असल्याचे समजते .
या फिटमेंट फॅक्टरचा विचार केला असता , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये चक्क 6,000/- रुपयांची वाढ होणार आहे . म्हणजेच केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगांनुसार 18,000/- रुपये किमान मुळ वेतन आहे , त्यात 6,000/- रुपयांची वाढ होवून किमान मुळ वेतन हे 26,000/- प्रतिमहा होईल .
यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांनुसार किमान मुळ वेतन 15,000/- मिळते तर नव्या वेतन आयोगांनुसार म्हणजेच 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे 21,100/- किमान मुळ वेतन होईल , म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनात चक्क 6,100/- रुपयांची वाढ होणार आहे .
फिटमेंट फॅक्टर वाढीची भुमिका काय ? – फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास , निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ होत असते , परिणामी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे इतर भत्ते ( वाहन भत्ता , प्रवास भत्ता , महागाई भत्ता ) यांमध्ये वाढ होत असते .एकंदरीत एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होते .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , सरकारी बातम्या / योजना व राजकिय / सांस्कृतिक व कला , क्रिडा यांच्या चालु घडामोडींच्या अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .