Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .

Spread the love

@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Old Pension: Letter submitted to Chief Ministers regarding implementation of old pension scheme by amending government decisions. ] : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजनाल ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , निवेदन पत्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना विधान परिषद सदस्य मा.सत्यजित तांबे यांच्याकडून सादर करण्यात आले आहे .

सदरच्या निवेदन पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , शासन निर्णयांमध्ये सुधारणा करुन अनुकंपा धारकांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या सदस्यांकडून प्राप्त निवेदनानुसार सदर निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत .

दिनांक 01.11.2005 पुर्वी भरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर Old Pension Scheme लागु करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णयानुसार अनुकंपा धोरणावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु नसेल असे नमुद करण्यात आले आहेत . तर सदर शासन निर्णयांमध्ये सुधारणा करुन अनुकंपा तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : महागाई भत्ता व वेतन आयोग लाभ मिळणार नाही , जाणून घ्या सविस्तर वृत्त..

ज्या उमेदवारांचे अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये दिनांक 01.11.2005 पुर्वी होते , परंतु त्यांना नियुक्ती ही दिनांक 01.11.2005 नंतर मिळाली आहे , अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञेय झालाच पाहीजे , अशी मागणी करण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment