@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding payment of arrears of salary, Government decision issued on 27.06.2025 ] : थकित वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 27 जुन 2025 रोजी महत्वहपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार मा.उच्च न्यायालय , मुंबई , खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका 765/ 2024 मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासुन ते नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 16,24,831/- रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
तसेच थकित वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक ( प्राथमिक ) पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
सदरचा निधी राज्य प्रकल्प संचालक , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपुर्त करण्यात येत आहेत . सदरचा निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव / कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत .
हे पण वाचा : प्रसार भारती अंतर्गत तब्बल 421 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक दि.07.04.2025 मध्ये नमुद केलेल्या सर्व अटींचे पुर्तता होत आहे , सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरीता अटी / शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत .

- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )