@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised government decision issued regarding granting of permanent certificate to officers/employees in state government service ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 11.06.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य शासन सेवेतील अस्थायी कर्मचाऱ्यांस / अधिकाऱ्यांस स्थायित्व प्रमाणपत्र लाभ प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे . तसेच त्या अनुषंगाने शासन सेवेतील प्रत्येक अस्थायी शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यास स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देणे संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत ,ते पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
सदर सुचना मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , प्रथम नियुक्तीच्या पदावर तीन वर्षाची नियमित सेवा पुर्ण करणाऱ्या तसेच नियुक्तीच्या आदेशात नमुद केलेल्या सर्व अटी / शर्तींची पुर्तता केलेल्या कर्मचाऱ्यांस स्थायित्व प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश आहेत .
तसेच कर्मचारी सेवेस पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे तसेच कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल . त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा सेवाभिलेख ( यांमध्ये गोपनिय अहवाल , उपस्थिती , सचोटी इ . ) विचारात घेणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
प्रत्यक पात्र अस्थायी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीने स्थायीत्व लाभ प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . गट ब ( अराजपत्रित ) , गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंबधित कार्यालय प्रमुख हे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी असणार असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- बदली प्रक्रिया 2025 संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.23.06.2025
- कर्मचाऱ्यांचे वयाधिक्य क्षमापित करणे व बदल्यांबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय ( GR ) निर्गमित दि.23.06.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.23 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- State Employee : सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास , राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार 4 हजार कोटी रुपये !
- ICICI व HDFC या खाजगी बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वपुर्ण बातमी ; दिनांक 01 जुलैपासुन नवे नियम लागु !