@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Sample of giving UPS/NPS/Modified NPS Pension Option to State Officers/Employees holding NPS (PDF) ] : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 20.09.2024 रोजीच्या ( वित्त विभाग ) शासन निर्णयानुसार पेन्शन बाबत विकल्प देण्याचे नमुद आहे .
सदर विकल्प नमुना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयास सादर करायची शेवटची तारीख आहे . उक्त शासन निर्णयानुसार सुधारित पेन्शन योजना ही दिनांक 01 मार्च 2024 पासुन लागु करण्यात आलेली आहे . तर सदर सुधारित पेन्शन योजना करीता दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प नमुना भरुन सादर करावयाचा आहे .
विकल्पामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु करावी याबाबत विकल्प द्यायचा आहे . यांमध्ये कर्मचाऱ्याचे सही / अंगठा , नाव व पदनाम नमुद करावयाचा आहे . तसेच स्थळ व विकल्प स्विकार करणाऱ्या प्रमुखाची सही व शिक्का नमुद असणार आहे .
हे पण वाचा : गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
सदर विकल्प भरल्यानंतर राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजनानुसार पेन्शन लाभ मिळणार आहे . जर सदर विकल्प नमुना भरलाच नाही तर आपणांस राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
यामुळे खाली नमुद असणारा विकल्प नमुना हा दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना भरुन आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचे आहे .विकल्प नमुना पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025