यंदा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द ; शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही मिळणार नाही सुट्टी !

Spread the love

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ School summer vacations canceled this year; Along with teachers, students will not get vacation either! ] : या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत , तर या सुट्टीच्या काळात शिक्षकांना विद्यार्थ्यांना भाषा व संख्याशास्त्र ज्ञानामध्ये परिपुर्णता करण्याचे काम करावे लागणार आहेत .

शालेय शिक्षण विभागाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , विद्यार्थ्यांच्या बुद्धीमतेमध्ये वाढ करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देखिल ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अध्यापन करावे लागणार आहेत .

सदर कार्यक्रम हो इयत्ता 2 री ते 5 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येत आहे .  शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची यंदाची उन्हाळ्याची सुट्टी रद्द होत आहे . या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहेत , तर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे .

सदर कार्यक्रमाचा कालावधी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या इयत्ता 2 री ते 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 75 टक्के भाषा व अध्ययन क्षमता परिपुर्ण करण्यासाठी दिनांक 05 मार्च ते दिनांक 30 जुन पर्यंत सदर निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !

01 मे पासुन जरी सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांना 30 जुन पर्यंत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे . तर निपुण उपक्रम अंतर्गत अपेक्षित असणारे अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा / शिक्षकांना प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहेत . या कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीला देखिल सहभागी करुन घेण्यात येणार आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment