@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important developments regarding UPS/GPS pension scheme option for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या युपीएस / जीपीएस पेन्शन योजना विकल्पाबाबत , आत्ताच्या काही महत्वपुर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
विकल्प देण्याची अंतिम दिनांक : राज्य शासन सेवेती एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी युपीएस / जीपीएस पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना लागु करणेबाबत विकल्प देण्यासाठी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे , अन्यथा विकल्प न दिलेल्या कर्मचाऱ्यांस राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु राहील .यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी विकल्प नमुना न चुकता भरावा ..
नविन युपीएस / जीपीएस पेन्शन योजना पुढील घटकांवर अवलंबून आहे .
- कपात सेवा
- जमा कॉर्पस / बेंचमार्क कॉर्पस
- फंड निवड
- एनपीएस मधून अंशत : काढण्यात आलेली / न काढलेली रक्कम
- आयुष्यमान
किमान पेन्शन : युपीएस पेन्शन योजना मध्ये किमान 10,000/- रुपये पेन्शन मिळणार आहे , तर जीपीएस पेन्शन योजनामध्ये किमान पेन्शनची रक्कम ही 7500/- इतकी असणार आहे .
हे पण वाचा : शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
एनपीएस मधील जमा रक्कम युपीएस / जीपीएस योजना स्विकारल्यानंतर मिळणार नाही , परंतु एनपीएस मध्येच कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास , सदर वारसाला सदर एनपीएस मधील 40 टक्के रक्कम दिली जाते .
याशिवाय सुधारित वरील दोन्ही पेन्शन योजनांमध्ये स्वेच्छा निवृत्तीनंतर पेन्शन रक्कम मिळत नाही . याशिवाय या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये जीपीएफ सुविधा देखिल लागु नाही . ही सुविधा केवळ जुनी पेन्शन योजनांमध्येच लागु आहे .
जर वरील दोन्ही सुधारीत पेन्शन योजना स्विकारल्यास , एनपीएस मध्ये जमा असणारी रक्कम काढता येणार नाही .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025