Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean & cotton production reduce ] : यंदाच्या वर्षी सोयाबीन , कापुस , तुरी , मका लागवडीमध्ये घट झालेली आहे , तर जागतिक पातळीचा विचार केला असता , सोयाबीन लागवडीमध्ये 01 टक्क्यांची वाढ झालेली आहे .
तर यंदाच्या वर्षी कापसाच्या लागवडीमध्ये तब्बल 11 टक्क्यांची घट झालेली दिसून येते , तर आपल्या रोजच्या आहरांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या तुर या पिकाच्या लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे . मागील वर्षी कमी पर्जन्यांमुळे तुरीच्या बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली होती . यामुळे तुरीच्या लागवडीमध्ये वाढ झालेली आहे .
पिकाची लागवड वाढल्यास उत्पादन देखिल वाढेल असे नाही , यामुळे सोयाबीन , कापुस , मका या पिकांसाठी पुढील दोन महिने परिपक्ववतेसाठी महत्वाचे ठरणार आहेत . सोयाबीन ची काढणी माहे ऑक्टोबर मध्ये होईल , तर कापूस वेचणीचे काळ माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर असा असणार आहे . या काळांमध्ये पाऊस झाल्यास सदर पिकांच्या उत्पादनांमध्ये मोठा विपरित परिणाम होवू शकतो .
मराठवाडा / विदर्भामध्ये अति पर्जन्यांमुळे विपरित परिणाम : राज्यात यंदाच्या वर्षी मराठवाडा / विदर्भ या विभागांमध्ये अति पर्जन्य मान झाले आहेत , याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे . सोयाबीन या पिकास मध्यम पर्जन्यमान लागते . परंतु यंदाच्या वर्षी मराठवाडा / विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे . यामुळे सोयाबीन पिकाची वाढ अधिकच झाली आहे , वाढ अधिक झाल्यास फळ कमी / दाणेदार होत नाहीत . यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
तर मका , तुर , कापुस उत्पादनांमध्ये यंदाच्या वर्षी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . यामुळे सदर पिकांचे बाजार भाव देखिल यंदाच्या वर्षी स्थिर राहतील . तर सोयाबीनच्या बाजार भावामध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024