Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean & kapus producer farmer anudan shasan nirnay ] : सन 2023 या वर्षातील हंगाम मधील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजना करीता स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सन 2023 या वर्षातील खरीप हंगाम मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरीता 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राकरीता सरसकट 1000/- रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राकरीता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5000/- ( 02 हेक्टरच्या मर्यादेत ) अर्थ सहाय्य देणेबाबत मा. उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी सन 2024 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये घोषणा केली आहे .
सन 2023 या सालाच्या खरीप हंगाम मधील कापुस व सोयाबीन उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणेकरीता नविन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय कृत बँकेत आयुक्त ( कृषी ) यांच्या नावे उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे . तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कृषी आयुक्तालयातील संचालक ( विस्तार व प्रशिक्षण ) यांना मेकर व आयुक्त यांना चेकर म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.
सन 2023 च्या खरीप हंगाम मधील कापूस , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य याकरीता प्राप्त होणारा निधीचा खर्च केवळ त्याच प्रयोजन करीता करण्यात यावा , असे नमुद करण्यात आला आहे . उक्त बचत बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेला निधी / व्याज तसेच योजनांच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम तसेच शिल्लक रक्कम याचा ताळमेळ घेवून निश्चित होणारी रक्कम शासकीय लेख्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही या दृष्टीने तात्काळ विनियोजनासाठी आवश्यक असेल त्याचवेळी कोषागारातुन निधी आहरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या बाबत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024