Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employe November Month payment update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या नियोजन विभाग मार्फत दिनांक 26.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गिमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत हाती घेण्यात आलेले आहेत . या अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दि.01.07.2024 रोजीच्या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच याकरीता माहीती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनायाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांखिकी कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2024 च्या वेतन ( Payment ) देयकासोबत जोडलेले नसल्यास , अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित करणेबाबत , राज्य शासनांच्या दिनांक 19.08.2024 रोजीच्या परिपत्रकानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच काही तांत्रिक कारणांस्तव कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाहीत , अशा कार्यालयांचे माहे नोव्हेंबर 2024 चे वेतन देयक पारित करण्याचे तसेच सदर नमुद संकेतस्थळातील तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्याच्या नंतर सुधारित निर्देश देण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024