Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee finance department imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातुन सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकास उपदान प्रदान आदेशांचे प्रदान पुर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करुन संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
दिनांक 01 ऑगस्ट 2024 नंतर राज्याच्या शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर इतर राज्यातील कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या उपदानाचे प्रदान करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांनी प्राधिकारपत्र निवृत्ती वेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातुन निवृत्ती वेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणार आहेत , त्या संबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई अथवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत मात्र महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांनी उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे प्राधिकारपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांऐवजी अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्यात लिपीक, शिपाई पदांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन..
तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा , जेणेकरुन महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत , निवृत्तीवेतनधारकाला सुचना / संदेश पाठविणे शक्य होईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024