Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee karyamulyamapan ahval ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.26.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही दि.31 डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येते , याबाबतची सुचना शासन परिपत्रक दि.17.11.2022 च्या परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे .
महापार या संकेतस्थळावर आतापर्यंत सर्व इंटरनेट वर उपलब्ध आहेत , परंतु दि.01.08.2024 पासुन सदरचे संकेतस्थळ केवळ NICNet / State Wide Area Network या नेट वर उपलब्ध आहे . अशा सुचना NIC Data Centre , Delhi यांच्या कडून प्राप्त झालेल्या आहेत .सदरची सुविधा NIC केवळ WebVPN द्वारा उपलब्ध करुन देणार असल्याचे नमुद आहेत .
तसेच WebVPN ही सुविधा काही अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने , कार्यमूल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची कार्यवाही पुर्ण करण्यासाठी 01 महिन्यांचे म्हणजेच दि.31.01.2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत . सदरची मुदत ही अंतिम मुदत असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
महापार मध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन 2023-24 या वर्षाचे गोपनिय अहवाल दिनांक 31.01.2025 रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत , तसेच सदर वरील नमुद करण्यात आलेल्या वेळेत ही सर्व प्रकारची कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी यांची राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .
- वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी !