मराठी पेपर टीम , सिद्धार्थ पवार , प्रतिनिधी : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले , यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे दोन मोठे महत्वपर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .
7 वा वेतन आयोग थकबाकी – राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातवा वेतन थकबाकी अदा करण्याचा मौठा निर्णय सदर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे .सदर कर्मचाऱ्यांना सन 2021-22 या सालापासून 7 th पे फरकाचा हप्ता पुढील पाच वर्षांमध्ये , पाच समान हप्त्यांमध्ये सातवा वेतन आयोग फरकाची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यानुसार आता 2021-22 आणि 2022-23 मधील दोन वर्षांचे हप्ते अदा करण्यासाठी 900 कोटी इतकी रक्कम मंजुर करण्यात आलेली असून , 01 जुलै 2023 रोजी देय असणार आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती धोरण केंद्र सरकारप्रमाणे लागु !
राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती धोरण केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या धोरणांनुसार राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरीता चार टक्के आरक्षण देण्यात येणार आहे . केंद्र सरकारकडून दि.17.05.2022 च्या आदेशानुसार राज्य शासन सेवेत दिव्यांग कर्मचारी यांना गट ड ते गट अ च्या सर्व स्तरावर पदोन्नती आरक्षण लागु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करण्याकरीता सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा मोठा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024