राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 वेतन अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar प्रतिनिधी [ State employees’ salary update for March 2025; know in detail ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 वेतन करीता वाट पाहावी लागणार आहे . शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक / माध्यमिक संचालनालय मार्फत निधीचे वितरण करण्यात आले आहेत .

परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्वच कोषागार कार्यालय अंतर्गत शिल्लक निधी ही सरकारकडे सरेंडर केली जाते , व परत आवश्यकता नुसार कोषागार कार्यालयांना वितरीत केली जाते . यामुळे माहे एप्रिल महिन्यात कोषागार कार्यालयांकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खर्चासाठी निधी शिल्लक असतो .

माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाकरीता सरकारकडून निधीचे वितरण करीता निदान आठवडा भराचा अवधी लागणार आहे , यामुळे सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होतील हे निश्चित आहे .

हे पण वाचा : अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !

राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे डी.ए फरक फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत काढण्यात आले नाहीत , अशा कर्मचाऱ्यांचा डी.ए फरक हा माहे मार्च महिन्यांच्या वेतन देयकासोबत , निधी उपलब्धतेनंतर काढायचा आहे . याबाबत आहरण व संवितरण कार्यालयामार्फत अधिकृत्त परिपत्रक जाहीर केले जातील .

ज्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यात घरभाडे भत्ता दर हे सुधारित ( 10 टक्के , 20 टक्के 30 टक्के ) दर झाले नाहीत, त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणालीमध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून अपडेट करुन घ्यायचे आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment