Breaking News : वेतन / पेन्शन मध्ये चक्क दुप्पट वाढ करणेबाबतच्या प्रस्तावाला सरकारची मंजूर !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ The government has approved a proposal to double the salary / pension ] : वेतन / पेन्शन मध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मंजूरी देण्यात आली आहे . या बाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

वेतन / पेन्शन प्रस्ताव : केंद्र सरकारकडून खासदारांच्या वेतन / पेन्शन मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आला होता , सदर प्रस्तावाला केंद्राकडून काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे .

खासदारांच्या वेतनातील वाढ : सन 2018 मध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या काळात खासदारांचे वेतन हे 50,000/- रुपये वरुन 1,00,000/- रुपये इतके करण्यात आले होते , आता पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून , आता खासदारांना दरमहा 1,24,000/- रुपये इतके वेतन मिळणार आहे .

वेतन व्यतिरिक्त खासदारांना मिळणारे इतर वाढीव भत्ते : खासदारांना वेतनाव्यतिरिक्त मतदारसंघ भत्ता म्हणून 87,000/- रुपये , तर प्रवास भत्ता म्हणून 16,000/- रुपये प्रति किलोमीटर ( रस्तामार्गे ) , तर विमान / रेल्वे प्रवास मोफत असतो .

हे पण वाचा : शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025

याशिवाय कार्यालयीन खर्च 75,000/- रुपये इतका मिळणार आहे , तसेच वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून दरमहा 500/- रुपये तर फोन , इंटरनेट भत्ता करीता दरवर्षी 1,50,000/- इतका भत्ता मिळतो .याशिवाय दरवर्षी 50,000 युनिट मोफत वीज मिळते .

इतर सोयी / सुविधा : वरील आर्थिक सुविधा व्यतिरिक्त खासदारांना सरकारी वाहन , चालक , सहाय्यक कर्मचारी याशिवाय कुटुंबियांना मर्यादित स्वरुपाचे प्रवास सुविधा मिळते , तसेच दिल्ली मध्ये मोफत सरकारी निवास स्थान मिळते . तसेच सीजीएचएस रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतो . तसेच संसदेच्या उपहार गृहामध्ये सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध होते .

माजी खासदारांना पेन्शन वृद्धी : माजी खासदारांच्या पेन्शन 25,000/- रुपये वरुन 31,000/- रुपये इतकी करण्यात आली आहे .तर अतिरिक्त सेवा काळाकरीता मासिक पेन्शन रक्कम ही 2500/-रुपयांनी वाढीव मिळणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment