राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी !

Spread the love

@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Unseasonal rain alert issued for “these” districts of the state in the next 24 hours ] सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडत आहे . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील परभणी , बुलढाणा,  अकोला, नागपूर , जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे अशा सूचना देण्यात आले आहेत .

तर रायगड , ठाणे,  मुंबई,  पालघर या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची सरी पडू शकतील असा इशारा देण्यात आलेला आहे . दरम्यानच्या काळात राज्यातील सरासरी तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे .

हे पण वाचा : दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , मराठवाड्यामध्ये परभणी , जालना , बीड या भागात पावसाचा अधिक जोर राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटसह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर पुढील काळात मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर काळामध्ये शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment