दिनांक 03 , 04 व 05 एप्रिल रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा : जाणून घ्या हवामान अंदाज !

Spread the love

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Unseasonal rain warning in these districts of the state on April 03, 04 and 05: Know the weather forecast.. ] : सध्या राज्यात सर्वत्र ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहेत , तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावस पडत आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 04 व 05 एप्रिल रोजी माठा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहीतीनुसार मध्य महाराष्ट्र भागात चक्रिवादळ होत असल्याने पाऊस सक्रिय होत आहे . दिनांक 04 व 05 तारखेला राज्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . हा अवकाळी पाऊस मराठवाडा व विदर्भात होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे .

03 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज : उद्या दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी मराठवाड्यातील नांदेड , परभणी भागांमध्ये , वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरीसर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

04 व 05 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 04 व 05 एप्रिल रोजी राज्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . यांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यात याशिवाय सातारा , जालना , छ.संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment