@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Very important circular regarding transfer process 2025 issued on 23.06.2025 ] : बदली प्रक्रिया 2025 संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 23.06.2025 रोजी ग्रामविकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात . संगणकीय प्रणाली द्वारे बदल्या करीताची सुविधा उपलब्ध करुन देणेकामी मे.विन्सीस I.T Services LTD. पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबींकरीता एक कार्यक्रम अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आलेली असून , त्या अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दुर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे .
तसेच दिनांक 18.06.2024 रोजीच्या निर्णयानुसार बदली प्रक्रिया मध्ये समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरु होण्याकरीता अंतिम करण्यात आलेली आहे .
तसेच बदलीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . तसेच सदरची तरतुद शासनांच्या दिनांक 07.11.2024 रोजीच्या पत्रानुसार जिल्हांतर्गत बदलीकरीता घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकामधील सुचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमि.अंतर्गत चालक पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती !
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने विविध टप्यांनुसार राबविण्यात येते . यांमुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पुर्ण करुन दुसरा टप्पा जात असताना पुन्हा आधीच्या टप्यावरील कार्यवाहीमध्ये बदली करता येणे शक्य नाही . तसेच बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे , बदलीकरीता होकार / नकार दर्शविणे , बदलीसाठी पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी ही सर्व जिल्हा परिषदांची असणार आहे .

- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )