@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Very important information (understanding) for state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण सुचना ( समज ) देण्याबाबत महसुल व वनविभाग मार्फत दि.23 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयांमध्ये व कार्यालयीन वेळामध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आलेले आहेत .
यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाते , परिणामी कामानिमित्त आलेल्या अभ्यागत , नागरिक यांना त्यांच्या कामाकरीता तिष्ठता रहावे लागते , अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब ही चुकीची असून , म.ना.सेवा नियम 1979 नुसाच उचित नाही .
यामुळे यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळात साजरे केल्याचे आढळून आल्यास , संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल .
हे पण वाचा : 15,000+ राज्य / केंद्र सरकारी नोकर भरती जाहिराती .. पाहा सविस्तर ..
तसेच यापुर्वी यापुर्वी अशा प्रकारचे समारंभ साजरे केलेले असल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आले आहे . व यापुढे अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )