@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Warning of rain with gusty winds for these districts of the state on March 21st and 22nd. ] : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढल्याने , पाण्याचे बाष्पीभवन होवून वादळी वाऱ्यासह पावसाची संभावना वाढली आहे . यानुसार पुढील दोन दिवसात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे .
माहे फेब्रुवारी महीन्याच्या 15 तारखेनंतर थंडीचे प्रमाण कमी होवून , कडक उन्हाळा सुरु झाला आहे . याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे .ही उष्णतेची लाट विदर्भ , मराठवाड्यात सर्वाधिक आहे . याचा विपरित परिणाम म्हणून लोकांना उष्माघाताचे प्रमाण वाढले आहेत . तसेच पिके होरपळून जात आहेत .
उष्णताचा परिणाम तसेच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे . सदरचा पाऊस हा ईशान्य भागाकडून चक्राकार पद्धतीने पडणार असून , सदर पाऊस राज्यात विदर्भ व मराठवाडा भागात हलका व मध्यम स्वरुपाचा पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्य महसुल व वन , बांधकाम व सा.प्रशासन विभाग अंतर्गत 385 पदांसाठी महाभरती !
या जिल्ह्यांना पावसाची शक्यता : राज्यात दिनांक 21 मार्च रोजी भंडारा , गोंदिया , गडचिरोली , चंद्रपुर , यवतमाळ , वाशिम , या जिल्ह्यांना पावसाचा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर दिनांक 22 मार्च रोजी नागपुर , भंडारा , वाशिम , गोंदिया , गडचिरोली , नागपुर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
यावेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 k.m प्रति तास वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे . तर मराठवाड्याचा विचार केला असता , आज व उद्या हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025