@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ What did employees get from the budget? ] : सन 2026 च्या अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही सलग आठव्यांदा केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दि.01.02.2026 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर केले . या अर्थसंकल्पांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या .
01.आठवा वेतन आयोग करीता स्पष्ट घोषणा / योजनाची तरतुद नाही : यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये आठवा वेतन आयोगासाठी विशेष तरतुद केली जाईल अशी अनेकांची धारणा होती , पंरतु प्रत्यक्ष आठवा वेतन आयोगासाठी सन 2027 चा अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे .
यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये आठवा वेतन / नविन वेतन आयोग बाबत विशेष तरतुद करण्यात आलेली नाही .याशिवाय अनेक पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी येत होत्या , सदर त्रुटींचे समाधान देखिल झालेले नाहीत .
आठवा वेतन लागु होईपर्यंत डी.ए वाढीसाठी मान्यता / व निधीचे वितरण : आठवा वेतन आयोग दि.01.01.2026 पासुनच लागु होत आहे , परंतु प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होईपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाचे डी.ए वाढीस व निधीचे वितरण करण्याची तरतुद सदर अर्थसंकल्पांमध्ये करण्यात आलेली आहे .
रेल्वे कर्मचाऱ्यांस प्रवास लाभ : रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे बजेट मध्ये रेल मंत्रालय अंतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना विशिष्ट मर्यादेत मोफत / सवलतीचे प्रवास लाभ देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .
सन 2026-27 वर्षाकरीता वेतन करीता अनुदान : सन 2026-27 च्या कर्मचाऱ्यांच्या वेतन या बाबीवर तसेच इतर लाभ अनुदेय करीता आवश्यक निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026