Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 08 major/important government decisions issued on 16.03.2026 regarding state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 16.03.2026 रोजी 08 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा संवर्गातील वर्ग 03 व वर्ग 04 च्या एकुण 136 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.सेवापुस्तकांची प्रत्यक्ष ( ऑफलाईन ) पडताळणी – महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची प्रत्यक्ष ( ऑफलाईन ) पडताळणी करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
03.अनुदान वाटप : शालेय शिक्षण विभाग मार्फत विविध लेखाशिर्ष अंतर्गत निधीचे वाटप करण्यास मंजूरी देण्यात आली आहे , व निधी बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे .
04.शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम वाटप : विधी व न्याय विभाग अंतर्गत शासकीय कर्मचारी इ. कर्ज – घर बांधणी अग्रिम वाटप करीता निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
05.पदोन्नती : विद्युत निरीक्षणालयातील अधिक्षक / मुख्य लिपिक / सहाय्यक विद्युत शुल्क निरीक्षक ( गट क ) या संवर्गातुन विद्युत शुल्क निरीक्षक गट ब ( राजपत्रित ) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे .
06.उच्च व तंत्र शिक्षण विभाग : अनुदानित कला संस्थांना वेतनेतर सहाय्यक अनुदानाच्या तिसरा व चौथ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
07.राज्य अन्न आयोग , मुंबई कार्यालयातील अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
08.शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्ग पदभरती : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मान्यता देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
वरील संदर्भात सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 08 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !
- यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या होणार रद्द ; हे आहेत 02 कारणे ..