@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important decisions were issued on 08.12.2025 regarding state employees! ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.08.12.2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत : मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यानुसार मंत्रालयीन विभाग मधील कक्ष अधिकारी संवर्गाची सन 2025 या वर्षातील..
दिनांक 01 जानेवारी ते दि.01 सप्टेंबर रोजीची मंजूर पदसंख्या मध्ये दिनांक 01.01.2025 पर्यंत मंजुर पदसंख्या 801 तर दिनांक 01.09.2025 पर्यंत 811 अशी मंजूर पदसंख्यास मान्यता देण्यात आली आहे .
02.वेतन व भत्ते अदा करणेकामी निधीचे वितरण : जिल्हा परिषद मधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील यांत्रिकी उपविभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद स्तरावर निर्मित पदावर हातपंप / विजपंप देखभाल दुरुस्ती करीता कार्यरत नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते त्याचबरोबर नियमित पदावरुन ..
निवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन व भत्तांकरीता निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे . तसेच यांमध्ये माहे जुन 2025 ते माहे ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचे वेतन घेणार असुन माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन घेण्यात येणार आहे .
03.नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत : रेशीम संचालनालय नागपुर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील तिन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; या प्रकरणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश !
- 07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!
- अनुकंपा नियुक्तीचे “सुधारित योजना” लागू करणे संदर्भात GR निर्गमित दि.27.01.2026
- NHAI : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदभरती 2026 ; Apply..
- वसई विरार महानगरपालिका अंतर्गत तब्बल 145 पर्यंत जागेसाठी महाभरती ; तात्काळ करा अर्ज .