शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.30.12.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding adjustment of teachers/non-teaching staff issued on 30.12.2025 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन बाबत दिव्यांग कल्याण विभाग मार्फत दिनांक 30.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा यांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजन करीता अतिरिक्त संवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे . यांमध्ये राज्यातील शासन मान्य खजगी अनुदानित ..

संस्थांची विशेष शाळा / कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थांनी विहीत मुदतीत केलेल्या अपिल प्राधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेले नसल्यास संबंधित उपक्रम लगेचच बंद करणेबाबत कार्यवाही करतील असे निर्देश देण्यात आले आहेत .

पटनिर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास , आकृतिबंधानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी माहे नोव्हेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रम मधील रिक्त पदांनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतोवर त्याच जिल्ह्यांमध्ये करतील असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच संबंधित जिल्ह्यांमध्ये पद रिक्त नसल्यास , अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच अन्य विभाग मार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित शाळा / कार्यशाळांमधील रिक्त पदे भरण्याकरीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधुन अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपुर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment