07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!

Spread the love

Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ TET exam and voting on the same day on the 7th; Big dilemma for teachers ] : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

परंतु सदर बदललेल्या वेळापत्रकामध्ये दिनांक 07 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे . तर याच दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा ( CTET) पूर्वनियोजित आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील शिक्षक सदर परीक्षा देणार आहेत .

राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत . या कार्यक्षेत्रातील बहुतांश CTET परीक्षार्थी शिक्षकांना मतदानाची ड्युटी आहे .

यामुळे सदर शिक्षकांनी मतदानाची ड्युटी करावी की , त्यांच्या भविष्याशी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षेस हजर रहावे असा पेच निर्माण झालेला आहे .

लवकरच पर्यायी व्यवस्थेची मागणी : यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षा करिता परीक्षार्थी असणाऱ्या शिक्षकांना सदर मतदान कर्तव्यातून सूट देण्याची मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे .

अन्यथा सदर मतदान वेळापत्रकामध्ये पुन्हा एकदा बदल करण्याची मागणी केली जात आहे . यावर निवडणूक आयोगाकडून लवकरच बदल केला जाईल , किंवा शिक्षक पात्रता परीक्ष (CTET ) वेळापत्रकामध्ये बदल केला जाईल .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment