इ.1 ली ते 12 वी सर्व शिक्षकांना TET पात्रता अनिवार्य असल्याची भुमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण – जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Court clarifies that TET qualification is mandatory for all teachers from 1st to 12th standard – know in detail. ] : इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गाकरीता शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे का ? या संदर्भात केंद्र सरकारकडून हलफनामा मागविण्यात आला होता .

यावर न्यायालयांमध्ये शिक्षक पात्रता संदर्भात भुमिका स्पष्ट करण्यात आली . यांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी ( माध्यमिक विभाग ) करीता शिकविणाऱ्या विशेष शिक्षक यांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का ?

यावर एएसजी भाटी यांनी आपली भुमिका स्पष्ट करताना नमुद केले कि …शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्व शिक्षकांकरीता अनिवार्य आहे , त्यांमध्ये माध्यमिक वर्ग शिक्षकांचाही समावेश आहे . तर सदर शिक्षकांना RCI चे प्रमाणपत्र देखिल आवश्यक आहे अशी भुमिका मांडली .

परंतु ए.एस.जी भाटी यांनी मांडलेल्या भुमिकेला कोणतेही तथ्य नसल्याचे भुमिका अमिकस क्युरी यांनी देखिल युक्तीवाद केलेला आहे . शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कंत्राटी शिक्षकांवर देखिल परीणाम होवू शकतो असा युक्तीवाद देखिल न्यायालयांमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे .

तर न्यायमुर्ती दत्ता यांनी सांगितले कि , समग्र शिक्षक योजना अंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्ती करीता मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली होती . त्यांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी वर्गाकरीता शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता असल्याची बाब स्पष्ट केली आहे , तर इत्ता 9 वी ते 12 वर्गाकरीता शिकविणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख नसल्याचे स्पष्टीकरण दिले .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment