Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important demand of Teachers’ Council to Rajs government regarding TET exam ] : शिक्षक पात्रता परीक्षा बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग मार्फत सरकारकडे पाठपुरावा केला आहे .
याकरीता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर तसेच ठाणे विधानसभा मतदासंघाचे आमदार संजय केळकर यांची भेट घेवून विविध मागणी मांडण्यात आल्या आहेत .
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील 02 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे . यामुळे पदोन्नती करीता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहेत .
यामुळे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक यांना पुढील पदोन्नती ( मुख्याध्यापक , केंद्र प्रमुख , केंद्र समन्वयक , विस्तार अधिकारी , विषय शिक्षक ) करीता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक असणार आहे .
15 वर्षे सेवा व 15 टक्के गुणांची सवलत : ज्या शिक्षकांची सेवा ही 15 वर्षे व त्यापेक्षा अधिक झालेली आहे , अशा ज्येष्ठ शिक्षकांचे वय , मानसिकता , तसेच नविन अभ्यासक्रमांचा विचार करुन गुणांमध्ये 15 टक्केची सवलत देण्याची करण्यात आली आहे .
म्हणजेच सदर शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सदर शिक्षकांना किमान 45 टक्के गुण प्राप्त झाल्यानंतर उत्तीर्ण करण्यात येईल . अशा प्रकारची सवलत द्यावी अशी मागणी राज्य शिक्षक मंत्री पंकज भोयर यांच्याकडे सादर करण्यात आली आहे .
- TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
- माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2026
- दि.20.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !