अनुकंपा नियुक्तीचे “सुधारित योजना” लागू करणे संदर्भात GR निर्गमित दि.27.01.2026

Spread the love

Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ GR issued on 27.01.2026 regarding implementation of revised scheme of compassionate appointment ] : अनुकंपा नियुक्तीचे सुधारित योजना लागू करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार राज्यामधील खाजगी , अनुदानित अंशतः अनुदानित , विनाअनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबीयास अनुकंपा नियुक्ती देणे संदर्भात सुधारित योजना लागू करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

सदर योजनाची व्याप्ती : सदर शासन निर्णयानुसार राज्यांमधील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीचे सुधारित धोरण लागू राहणार आहेत . त्याचबरोबर स्वयं-अर्थ सहाय्यित तत्त्वावर स्थापन झालेल्या त्याचबरोबर विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही , असे स्पष्ट करण्यात आले आहे .

सदर योजना कोणास लागू आहे ? : सदर योजना मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयास ही योजना लागू असणार आहे . यामध्ये प्राधान्यक्रम प्रथम पती-पत्नी , मुलगा/ मुलगी (अविवाहित) , मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलगा/ मुलगी घटस्फोटीत मुलगी किंवा बहिण दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल , तर त्याची सून , दिवंगत अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहिण असा प्राधान्य क्रम असणार आहे .

वयोमर्यादा : सदर योजनेच्या माध्यमातून अनुकंपा नियुक्तीवर नियुक्ती देत असताना सदर कुटुंबीयाची किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .

यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..

WhatsApp Group Join Now

Leave a Comment