@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister’s Youth Work Training Scheme extended by 11 months ] : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा 11 महिन्यांचा करण्यात आला आहे . त्या अनुषंगाने कौशल्य , रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर योजनांस मुतदवाढ देताना प्रमुख दोन अटी नमुद करण्यात आल्या आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सदर प्रशिक्षण कालावधी हा यापुढे वाढविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच या येाजना अंतर्गत आस्थापना / उद्योग / महामंडळ विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे .
सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरुपी नोकरीचा हक्क राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच सदर प्रशिक्षण कालावधीस 11 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे , परंतु सदर मुदतवाढ देताना पुर्वीचा 6 महिन्यांचा अवधी धरण्यात आला आहे .
यामुळे पुर्वीचे 6 महिने ग्राह्य धरुन आता केवळ 5 महिने बाकी राहीले आहे , म्हणजेच 11 महिन्यापैकी 6 महिने कालावधी हा पुर्ण झालेला असून आता 5 महीन्यांसाठी सदर प्रशिक्षण काळास मुदतवाढ देण्यात आलेले आहे .
सदर योजना ही प्रशिक्षण योजना असुन रोजगार नाही : सदरची योजना ही एक प्रकारची प्रशिक्षणार्थी योजना असुन नोकरी नाही . यामुळे सदर योजनास मुदत वाढ दिली तरी केवळ प्रशिक्षण कालावधी वाढून प्रशिक्षण मानधन अदा केला जाईल .
अटी व शर्ती संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनास 11 महिन्यांची मुदतवाढ ; नेमक्या अटी / शर्ती काय आहेत – जाणून घ्या दोन्ही GR !
- शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे ( अग्रिमे ) मंजूर करणेबाबत शासन निर्णय ; GR दि.11.03.2025
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ; अखेर शासन निर्णय निर्गमित दि.11.03.2025
- थकीत वेतन अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.10.03.2025
- सेवानिवृत्तीवेतन संदर्भात पार पडलेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे ; जाणून घ्या सविस्तर परित्रक !