अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !

Spread the love

@marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Gold and silver prices rebound again due to rising US-Venezuela tensions ] : अमेरिकेने व्हेनेझुएला देशाचे राष्ट्रपती यांना एक ऑपरेशन राबवत फक्त अर्धा तासामध्ये त्यांच्या पत्नी समवेत अटक केली आहे .

यामुळे जागतिक बाजारपेठावर नेमका कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . व्हेनेझुएला या देशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा देश सर्वाधिक तेल उत्पादक देश आहे . अमेरिकेने या देशावर हल्ला केल्याने जागतिक युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे .

यामुळेच सोने -चांदी दरामध्ये पुन्हा एकदा उसळी मारण्याची भिती निर्माण झाली आहे . तज्ञांच्या मते अमेरिका – व्हेनेझुएला देशाच्या वाढत्या तणावामुळे जागतिक युद्धाचे पडसाद निर्माण होवून , सोने – चांदी मधील गुंतवणूक वाढू शकेल . व शेअर बाजारातील गुंतवणुक कमी होण्याची भिती आहे .

या युद्धजन्य स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती मध्ये गॅप-अप ओपनिंगची अपेक्षा आहे . यामुळेच सोने , चांदीच्या किंमतीमध्ये उसळी मारण्याची भिती आहे .

तर दुसरे कारण म्हणजे चीन देशाकडून चांदीची मोठ्या प्रमाणात आयात सुरु आहे . यामुळे जागतिक बाजारपेठेत चांदीचा तुटवडा निर्माण होईल , व परिणामी चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकेल .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment