महीला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत (लैंगिक छळ ) महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.18.03.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding the safety of female employees issued on 18.03.2025 ] : महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत , कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियम अंतर्गत तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करणेबाबत , विधी व न्याय विभागांकडून दिनांक 18 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन आदेशानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ( प्रतिबंध , मनाई व निवारण ) अधिनियम 2013 व त्या नुषंगिक तयार करण्यात आलेल्या नियमामधील तरतुदीनुसार , त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रक व शासन निर्णयामधील तरतुदीनुसार , विधी व न्याय विभाग …

मंत्रालय खुद्द मुंबई , नागपुर व औरंगाबाद शाखेमधील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाबाबत , येणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्याकरीता विधी व न्याय विभागाच्या दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार विभागीय समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा ; आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्युट ऑफ लर्निंग अंबरनाथ , ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

सदर कार्यालयीन आदेशानुसार समितीमधील सदस्यांच्या पदोन्नतीमुळे बदल झालेल्या पदानामामध्ये बदल करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर बदली झालेल्या सदस्यांच्या ऐवजी नविन सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत . सदर बदल करण्यासाठी दिनांक 28.09.2022 रोजीच्या आदेश अधिक्रमित करण्यात येत असून , सदर समितीमध्ये पुर्नरचना करण्यात येत आहेत .

यांमध्ये विधी व न्याय विभागाच्या सह सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 05 सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहेत . कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियम 2013 अनुषंगाने करण्यात आलेल्या नियम 3 मधील तरतुदीनुसार समितीमधील अशासकीय सदस्यास दैनंदिन भत्ता व प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment